Wednesday, December 13, 2006

मरवा

मरवा

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहीसे
देता घेता त्यांत थरारे

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला
देता घेता उमटे काही
मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यांत मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा
- इंदिरा संत

No comments: